इतर

संस्थेविषयी थोडक्यात!

निवासी मुक बधिर विद्यालयाची स्थापना:
थोर समाजप्रबोधनकार, महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नारायण विष्णु तथा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या शिकवणुकीतून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे, सर्वधर्मसमभाव निर्माण करणे, शैक्षणिक संस्था व वसतीगृहे चालविणे व तद्अनुषंगाने अपंग मुलांचे शिक्षण , कल्याण व पुनर्वसन करणे यासाठी ‘श्री यशोदीप कला, क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ, बारामती ‘ या संस्थेअंतर्गत ‘ निवासी मुक बधिर विद्यालय ’ यांची स्थापना करण्यात आली. विद्यालयात पायरी १ ते इयत्ता १०वी पर्यंतच्या मुलांना शालेय शिक्षण दिले जाते. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून ५ ते १८ वर्षे वयोगटातील मुक-बधिर बालकांच्या शिक्षण व पुनर्वसनाचे कार्य संस्थेकडून केले जाते. विद्यार्थ्यांना जेवण, राहणे, गणवेश इ. पूर्ण शैक्षणिक सोयी-सुविधा मोफत संस्थेकडून पुरविल्या जातात. मुक-बधिरांचे शास्त्रोक्त पद्धतीच्या शिक्षणासाठी लागणारी आवश्यक ती यंत्रसामुग्री संस्था स्वनिधी तसेच देणगीच्या स्वरुपात स्वीकारत असते. अतिशय दुर्गम भागातील, खेड्यापाड्यातील अत्यंत गरीब तसेच झोपडपट्टीतील बालके या सर्व गोष्टींचा लाभ घेत आहेत. या सर्व बालकांचे संगोपन करणे, त्यांचा रोजचा नाश्ता, जेवण, राहणे, गणवेश, तेल, कपडे, साबण इ. तद्अनुषंगिक आवश्यक त्या सर्व बाबी पुरविणे हे अत्यंत खर्चिक काम संस्था सातत्याने करीत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने तसेच संस्थेच्या हातभारामुळेच आजपर्यंतची विद्यालयाची वाटचाल चाललेली आहे. समाजातील आश्रयदाते , सामाजिक मदतीच्या रुपाने वित्तीय संस्थांनी आर्थिक मदतीच्या रुपाने हे थोर कार्य पुढेही चालू राहावे याकरिता हातभार लावावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

संस्थेचे उद्दिष्ट

आजपर्यंतच्या देणगीदारांची नावे

खालील सर्व व्यक्तींनी/ संस्थांनी केलेल्या मदतीमुळे संस्था त्यांची कायम ऋणी राहील.
Designed and Maintained By Sterling Systems Pvt. Ltd.